Friday, October 24, 2008

कशासाठी असते ही धावपळ ?

धन्यवाद चित्रा आणि किरण...!

या ब्लॉगला अधिक 'Intersting' केल्याबद्दल...

या ब्लॉगचा उद्देश पहिल्याच पोस्टमध्ये  सांगितला आहे. 

इथं, esakal.com मध्ये आम्ही सगळे एक टीम म्हणून काम करीत असतो. मीडिया हाऊसमध्ये जी काही धावपळ चालते, ती सगळीच नेहमी, अगदी 24x7x365 न चुकलेली. 

एक मुलभूत प्रश्न या धावपळीत  बहुतांश विसरूनच जातो...

कशासाठी असते ही धावपळ ? 

ती धावपळ ज्यांच्यासाठी चालते, त्यांना पेपरमध्ये 'वाचक', टीव्हीवर 'व्ह्युअर', रेडिओवर 'श्रोते, लिस्नर' आणि इंटरनेटवर 'ऑनलाईन ऑडियन्स' म्हणतात...! 

ज्यांच्यासाठी सगळी धावाधाव चालते, त्यांना ती पसंत पडतेय का?, पडत नसेल तर काय चुकतंय? पसंत पडत असेल, तर आणखी काय हवंय? ते कसं द्यायचं? ते देताना आमच्या 'limitations' काय? त्या कशा ओलांडता येतील...? अशा असंख्य शंका इथं मांडतोय आम्ही. कदाचित पेपरमध्ये हे अशक्य आहे, रोज वाचकांशी संपर्क साधणं. पण, इथं ऑनलाईन मीडियात शक्य आहे. तुमच्याशी रोजच्या रोज बोलणं. 

त्यासाठी हे ब्लॉगचं माध्यम.

दिवाळीच्या या साईटचं तुम्ही भरभरून स्वागत केलंयच. या साईटमधला प्रत्येक सेक्शन सजवलाय तो किरण, चित्रा आणि प्रियानं. ऑडिओ-व्हिडिओ हे esakal.com  चं वेगळेपण राहिलंय. किमान भाषिक वेबसाईटस् मध्येतरी. ते अधिक रेखीवपणानं दिवाळीच्या साईटवर मांडलं गेलंय. वेबसाईट म्हणून सगळ्या वैशिष्ट्यांसह दिवाळीत ई सकाळ सादर झालाय.

आता, त्यात तुमचाही सहभाग आता हवायंच. तुमच्याकडच्या दिवाळीचा. तिथल्या सेलिब्रेशनचा....

2 comments:

a said...

MORE BEAUTIFUL DIWALI WALL PAPER SHOULD BE ADD IN dIPOTSAV.

mayrya said...

चित्रा,

फारच मजा आली. खूप कष्ट घेऊन बनवली आहे तुम्ही साईट. बरं झालं तू मला जरा आग्रह केलास ते. भरपूर मटेरियल आहे वाचायला, बिल्वा द्रवीडचे राग आणि त्याहीपेक्षा बाबूजींचं वंदे मातरम् ऐकायला फार मजा आली, नारळीकरांचे अनुभव ऐकायलाही तेवढीच मजा आली, अजून बरंच काही ऐकायचं वाचायचं आहे, पण एकूणात चांगला अनुभव दिलाय त्याबद्दल धन्यवाद.