Thursday, October 9, 2008

मधमाशांच्या पोळ्यात...

ई सकाळवरच्या "पैलतीर'या सदराच्या निमित्तानं खूप वाचकांशी बोलायला मिळतं...त्यांच्याशी ओळख होते, मैत्रीही होते...ती अजून वाढावी, आमच्या या मधमाशांच्या पोळ्यात काय गुणगुण...कधी भूणभूण चालू असते ते वाचकांना कळावं...यासाठी Inside beehive ...

सतत घाई-गडबड...डेडलाइन्स...नव्या असाइनमेंटस्‌...काम आवडतं...पण जरा थांबून मागं वळून बघायला फुरसत नसलेलं...सतत काहीतरी नवं हवं असं माननियांचं म्हणणं...

या सगळ्या गोंधळातून हळूहळू एखादं चित्र आकार घेतं...छानसं रुपडं तयार होतं...मग ते तुम्हा साऱ्यांना कसं आणि किती आवडेल याकडे चातकासारखं लक्ष...

तर असं हे फक्त मीच नाही तर आम्ही सारेच ...रोजच्या रोजच करत असतो...त्यात वाचकांशी असलेला "कनेक्‍ट' जपायचा असतो. नव्हे तो जपला नाही तर मग इतर काहीच सुरात चालणार नसतं.

तुम्ही सारे...थेट आमच्याशी "कनेक्‍ट' होणारे...त्यासाठी एक खास प्लॅटफॉर्म मिळावा हा या inside beehive चा - मधमाशाच्या पोळ्यामध्ये'चा हेतू बरं ! ईसकाळच्या या "पोळ्या'तली धामधूम तुमच्यापर्यंत पोहोचते आहे "सीमोल्लंघना'च्या मुहूर्तावर...

आम्ही मोकळेपणानं व्यक्त होऊ...अन् तुम्हीही थेट व्यक्त व्हा...आपण सारे चाणाक्ष वाचक आहात याबद्दल आमच्या मनात शून्य शंका...त्यामुळे या मधमाशांच्या पोळ्याचा - Inside beehive ...चा हेतू सोडून तुम्ही आम्ही भरकटणार नाही याची खात्रीच आहे म्हणा ना...

No comments: