कोणाकडून काय गाऊन घेऊया...लिहून घेऊया...कसं, केव्हा, कधी...डेडलाईन काय...हे सगळं जुगाड कसं जमणार...बजेट काय...हे अन् ते...बोलाचाली, भांडणसदृश संभाषण, मग कामाचे विविध टप्पे, आणि मग...फायनल प्रोडक्ट...
प्लॅन करायला मला फार मजा येते. आमच्याकडे फीचरचेही दिवस असतात. श्रावणापासून डिसेंबरपर्यंत फीचरची गर्दी असते.
"हे माझं कामच आहे' ...इतकं ड्राय असलं तरी फीचर प्लॅन करणं हा इतका स्वतःशी "कनेक्ट' करणारा अनुभव असतो...आणि त्या "कळा' शेअर करायला तुम्ही सारे आहात हे आणखी विशेष...ई सकाळवरची फीचर आवर्जून पाहाणारे, त्यावर प्रतिक्रिया देणारे...
फीचरच्या हंगामात, घरून ऑफीसला येईपर्यंत, सगळी रोजची कामं करताना घाई होते. कधी ऑफीसला पोहोचतोय, चहा घेतोय आणि स्वतःमध्ये रमतोय असं होतं...हा काळ फार मस्त असतो. डोक्यात काहीबाही चालू असतं आणि सतत "वेगळं' काही हवं असतं. ते सुचेपर्यंतचा वेळ हा माझा सर्वांत आवडता ! ती अस्वस्थता भारी हवीशी वाटते.
आताही नवरात्रीची मायक्रोसाईट अजून ई सकाळवर आहे आणि मी दिवाळी फीचर प्लॅनसाठी जुनी झालेली, काहीतरी गिरमिट केलेली वही घेऊन बसले आहे. दिवाळीचं फीचर म्हणजे नेहमीचं - लागणारं या सदराखाली येणारं मॅटर तर असेलच...पण वेगळं काय?
...काहीही सुचत असतं, काही टाकाऊ, काही खरंच छान पण प्रत्यक्षात येणं दुरापास्त असलेलं...वहीची पानं गिचमिडीत भरतात...मग हळूहळू चहाच्या पुढच्या कपासोबत साऱ्या गिरमिटाला अर्थ येतो. ई सकाळच्या टीमनं सुचवलेल्या कल्पना, त्यांचा सहभाग हे सगळं काही पांढऱ्यावर काळं करायचं असतं...
मागच्यावेळीही दिवाळीची मायक्रोसाईट करताना धमाल आली होती. तेव्हाचे सहकारी मात्र आता नाहीयेत...कुठेकुठे गेलेत... असो...
सगळे म्हणतात मला, की तेच ते करून कंटाळा नाही का येत....येतो... आणि नाहीही...कारण नवं काही करायचं ही इच्छा असते आणि मग या सगळ्या "त्याच त्या'पणातून काहीतरी छानदार सुचतं...एकच अक्षर खूपदा गिरवल्यावर मग छान यायला लागतं तसं...
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
सौ. चित्रा वाळींबे,
आपला हा उपक्रम स्तुत्य आहे. असाच चालू ठेवा.
शुभेच्छांसह...
hi
speedpost kadhi diwali sampalyavar yenar ahe ka?
Post a Comment